सांगली : तरसाच्या धडकेत वाळेखिंडी येथील युवक जखमी

सांगली : तरसाच्या धडकेत वाळेखिंडी येथील युवक जखमी

जत; पुढारी वृत्तसेवा : वाळेखिंडी (ता.जत) येथे तरसाच्या हल्ल्यात शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. संजय रामचंद्र टोणे (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळेखिंडी गावातील शेतकरी संजय टोणे हे गावापासून चार किलोमीटर अंतरावरील टोनेवस्ती येथे राहतात. ते दुचाकीवरून गावाकडे कामानिमित्ताने गेले होते. काम आटोपून पुन्हा घरी जाताना पाटील वस्ती येथून पुढे काही अंतरावर एका तरसाने संजय टोणे यांना पायाजवळ धडक दिली. यामुळे संजय हे बाजूला जाऊन पडले. या धडकेत पायाच्या गंभीर दुखापत झाली आहे. या मार्गावर रहदारी अत्यंत कमी आहे. तसेच हा भाग डोंगराळ आहे.

यासह या क्षेत्रात ऊसशेती मोठेप्रमाणात असल्याने मदतीसाठी अडचण आली. त्यातूनही स्वताला सावरत संजय यांनी आशिष शिंदे, राजेंद्र टोणे, प्रवीण बाबर यांना फोनवरून घटना सांगितली. त्यानंतर या तिघांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचारासाठी संजय यांना सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news