शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विश्वजित कदम विधानसभेत आक्रमक

ना. विश्वजीत कदम
ना. विश्वजीत कदम
Published on
Updated on

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानसमेत सरकारला धारेवर धरले. पिकांना पाणी मिळत नाही, नुकसान झालेल्या फळबांगाचे नुकसान भरपाई दिली जात नाही. लंपीमुळे जनावरांचे नुकसान झाले आहे, अशी परिस्थिती असताना राज्य सरकार मदत करण्यास का दिरंगाई करत आहे. असा सवाल त्यांनी नागपूर अधिवेशनात उपस्थित केला. Vishwajit Kadam

कदम पुढे म्हणाले की, पश्चिम महराष्ट्रातील काही तालुके अजून दुष्काळ ग्रस्त आहेत. त्यांचा समावेश झालेला नाही, ही सरकारच्या कामाची दुरवस्था आहे. सन 2019 व 21 ला महापूराचा फटका बसला पूर परिस्थितीबाबत वडणेरी समिती नेमण्यात आली होती. याबाबत त्यांनी अहवाल तयार केला होता. त्याचाही विचार होवून तातडीने कार्यवाही करण्यात यावी. अतिवृष्टी, गारपीटीमुळे सांगली जिल्हयातील द्राक्ष, डाळींब बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार पाचशे कोटींच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. Vishwajit Kadam

शंभूराज देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेऊन दुष्काळाच्या परिस्थितीत ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांना पुरेसे पाणी द्यावे. महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडी काळामध्ये महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. कोरोनाच्या काळामध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजारांचे अनुदान जाहीर केले होते. मात्र नंतरच्या काळात जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेत कित्येक शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले.

दुष्काळी परिस्थितीत कडेगाव, खानापुर, जत , कवठेमहांकाळ, मिरज भागातील काही गावांना सिंचन योजनांच्या पाण्याची कमतरता भासत आहे. डिसेंबरमध्ये जर पाण्याचे टँकरने पाणी दयावे लागत असेल. तर उन्हाळ्यात दुष्काळाची परिस्थिती काय होईल, याचा गंभीरपणे विचार हावा, या परिस्थितीत शासनाची भावना काय आहे. शेतकऱ्यांना का डावलले जात आहे,असा सवाल आमदार कदम यांनी यावेळी केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news