सांगली : नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कचे आवाहन

कृष्णेच्या पाणीपातळी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Sangli Krishna river flood
कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणारPudhari File Photo
Published on
Updated on

कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी शुक्रवारी (दि.2) सायंकाळी 5 वाजता 39 फूट 9 इंच इतकी आहे. दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याव्दारे सातारा जिल्ह्याकरिता रेड व आँरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 2 ते 3 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. मुक्तपाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील विसर्गवाढीमुळे पाणीपातळी मध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Sangli Krishna river flood
सांगली : शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी कायम
Summary

धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग क्युसेक्समध्ये

  • कोयना धरणामधून 52 हजार 100

  • धोम धरणातून 7 हजार 856

  • कन्हेर धरणातून 4 हजार 844

  • धोम बलकवडी धरणातून 1 हजार 415

  • उरमोडी धरणातून 2 हजार 973

  • तारळी धरणातून 4 हजार 960

  • वारणा धरणातून 11 हजार 532

Sangli Krishna river flood
सांगली : बाडबिस्तारा घेऊन नव्या निवार्‍याला
Summary

वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news