सांगली : दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आमदारांनी एकत्रित यावे : विश्वजीत कदम

सांगली : दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आमदारांनी एकत्रित यावे : विश्वजीत कदम
Published on
Updated on

जत; पुढारी वृत्तसेवा : सध्याची परिस्थिती पाहता राज्यात शेतकरी व दुष्काळी शेतकरी अशी दोन भागात विभागणी झाली पाहिजे. राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा आजही गंभीर आहे. दुष्काळग्रस्तांचा बुलंद आवाज विधानसभेत घुमला पाहिजे. त्यासाठी राज्यातील दुष्काळी भागातील आमदारांनी एकत्र आले पाहिजे. या आमदारांनी एकत्र येवून आवाज उठविल्यास त्याची दखल कोणतेही सरकारला घ्‍यावीच लागेल. यामुळे दुष्काळी भागातील आमदारांनी एकसंघ व्हावे, असे आवाहन माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. जतचे विद्यमान आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय माळरान कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे व जतचे काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत एकाच व्यासपीठावर आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आ.डॉ. विश्वजित कदम होते.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली जिल्हा बँकेचे संचालक, श्रीपती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्रआप्पा लाड, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे नामदेव मोहिते-पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, ऋषिकेश लाड, सोनहिराचे संचालक भोसले, महेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाढदिवसानिमित्त आ.सावंत यांचा हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे राजकीय टोलेबाजी पहावयास मिळाली. आ. शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. विश्वजित कदम हे कार्यक्रमाला उशिरा आल्याने त्याअगोदर आ. शहाजीबापू यांनी टोलेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिरादार, कार्याध्यक्ष सुजयनाना शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणी मुल्ला, सोसायटीचे संचालक दादा डिक्सळ, संतोष मठपती, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, रामपूरचे सरपंच मारुती पवार, जत नगर परिषदेचे माजी सभापती भुपेंद्र कांबळे, मोकाशेवाडीचे माजी सरपंच आण्णासाहेब गायकवाड, ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थेचे दीपक अंकलगी, चेअरमन संतोष स्वामी, समाधान शिंदे,धैर्यशील चव्हाण. दत्तात्रय निकम, महादेव आथणीकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news