सांगली : किरकोळ कारणातून युवकावर तलवार हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

जत; पुढारी वृत्तसेवा : बिरनाळ (ता.जत) येथे आर्केस्ट्राच्या स्टेजवर वाढदिवस साजरा करण्यास विरोध का करतोस, असे म्हणत युवकावर तलवार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सचिन महादेव यमगर (व३१, रा. बिरनाळ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सचिन यमगर यांनी दोघाविरुद्ध जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी धनाजी बापू यमगर, संजय दादासो यमगर (दोघेही रा. बिरनाळ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, बिरनाळ येथे आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातीलच एकाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. यास सचिन यमगर हा विरोध करत आहे. असा गैरसमज संशयित आरोपी धनाजी यमगर व संजय यमगर यांच्यात झाला.

यातून शनिवारी (दि.७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सचिन सरगर यास तुला लय मस्ती आली आहे काय, आर्केस्ट्रा कार्यक्रम ठिकाणी माझा वाढदिवस करण्यास विरोध का करतोस? असा जाब विचारात तलवार व कोयत्याने हल्ला करण्यात आला. यात सचिन यमगर हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news