सांगली : ४० हजाराची लाच घेताना उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक

सांगली : ४० हजाराची लाच घेताना उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देवून सोडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाकडून 60 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ठरलेली 40 हजाराची लाच स्विकारताना अकबर खताळसो हवालदार (वय 53, रा. अल्फान्सो स्कूलजवळ, मिरज) या पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अकबर हवालदार हे विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्यावर त्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , तक्रारदार यांचा भाऊ व इतर दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक अकबर हवालदार याने सुरुवातीला 60 हजार लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देण्यासाठी गुन्ह्यात मदत करण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये असे एकूण 60 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 40 हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हवालदार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हवालदार याला न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने त्याला (दि. 23) पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news