

जत; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा दि.१९ फेब्रुवारीच्या आतच पार पडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची दोन दिवसात मुंबई येथे भेट घेऊन तारीख निश्चित करणार आहे. तारीख मिळो अथवा नाही. मात्र, हा सोहळा स्थानिक लोकांच्या उपस्थितीत केला जाईल. अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गोपनीय विभागाकडून सीमा भागातील परिस्थितीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संबंधित सर्व परवानग्या मिळाल्या आहेत का? याचा अहवाल मागवला आहे. असेही जगताप यांनी सांगितले. माजी आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले, जत शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला आयोजित करावा म्हणून हे सर्वच शिवभक्तांमध्ये उत्सुकता आहे. तो लवकरच व्हावा, यासाठी आग्रह आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सीमा भागातील परिस्थितीचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या संबंधित सर्व परवानग्या मिळाल्या आहेत का, याचा अहवाल मागवला आहे. यानंतर कदाचित दोघांचा दौरा निश्चित होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, यासाठी मी दोन दिवसात मुंबई येथे जाणार आहे. तारीख दिली तर ठीक अन्यथा कोणाचीही प्रतीक्षा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला जाईल, असेही माजी आ. विलासराव जगताप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार बैठकीस रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष अण्णा भिसे, बसवराज चव्हाण, गौतम ऐवळे, सद्दाम अत्तार,संतोष मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा;