Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवेळी पोलिसांचा लाठीमार? अ‍ॅड. दीपक लाड जखमी, शेतकऱ्यांनी मोजणी थांबवली

मोजणीदरम्यान शक्तिपीठ आंदोलनामध्ये लढाऊ भूमिका घेणारे पलूस कडेगाव खानापूर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे नेते निमंत्रक अ‍ॅड. दीपक लाड यांच्यासह शेकडो शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.
mahuli Shaktipeeth Highway Protest
mahuli Shaktipeeth Highway ProtestFile Photo
Published on: 
Updated on: 

Shaktipeeth Highway Protest

सांगली: माहुली येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आज प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोजणीदरम्यान शक्तिपीठ आंदोलनामध्ये लढाऊ भूमिका घेणारे पलूस कडेगाव खानापूर शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे नेते निमंत्रक अ‍ॅड. दीपक लाड यांच्यासह शेकडो शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यामुळे माहुली परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी अ‍ॅड. दीपक लाड यांना पोलिसांकडून जबर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या पाठीवर काठीचे वळ उमटले असून, हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान त्यांना प्रचंड वेदना होत असल्याचे समजते.

mahuli Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth highway: कोल्हापुरात 'शक्तिपीठ'च्या मॅपिंगविरोधात संतापाचा उद्रेक; भुदरगडमध्ये शेतकऱ्यांनी मोजणी मशीन पेटवलं

या मारहाणीनंतर पोलिसांकडून दिलगिरी व्यक्त करून हा विषय मिटविण्याची विनंती केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावेळी अ‍ॅड. दीपक लाड यांनी ठाम भूमिका घेत उत्तर दिले की, "आम्ही क्रांतिकारकांचे वारसदार आहोत. एका काठीने आम्ही घाबरणार नाही. आमच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे. या ठिकाणी आमचे रक्त जरी सांडले तरी शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढ्यातून आम्ही मागे हटणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अखेर अ‍ॅड. दीपक लाड आणि शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आणलेले मशीन उचलून पोलीस व्हॅनमध्ये ठेवले. त्यामुळे सध्या या ठिकाणी महामार्गाची मोजणी थांबविण्यात आली आहे. माहुली परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी तातडीने या मोजणी पॉईंटवर उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. दीपक लाड यांनी केले आहे.

mahuli Shaktipeeth Highway Protest
Sangli Shaktipeeth Highway : वाळवा तालुक्यात शक्तिपीठ महामार्ग सर्वेक्षणाला तीव्र विरोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.