

Shaktipeeth Expressway issue farmer protest Chandrakant Patil convoy blocked Sangli
सांगली :
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकात जोरदार झटापट झाली.
शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत. यापूर्वीही शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे सांगलीत निषेध आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ. प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, एकही इंच जमीन देणार नाही, असा इशारा त्यावेळी समितीने दिला होता. त्यावेळी कर्नाळ, बुधगाव, माधवनगर येथील गावातील शेतकऱ्यांनी मिळालेल्या नोटिसांचे दहन केले होते. कारण निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत महामार्ग करणारच, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळेच आताही त्याचे पडसाद कायम उमटत आहेत.
शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-विजापूर महामार्गाला समांतरच आहे. रत्नागिरी-विजापूर रस्त्यावर वाहनांची गर्दीही नाही. आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही. मग हा महामार्ग बनवण्याचा घाट कशासाठी होतोय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे?