सांगली : शेत तलावात पाय घसरून तरुणाचा मृत्यू 

सांगली : शेत तलावात पाय घसरून तरुणाचा मृत्यू 

जत, पुढारी वृत्तसेवा : बिळुर (ता. जत) येथे शेत तलावातील पाणी काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. रामगोंडा परगोडा हिप्परगी (वय २५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने बिळुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रामगोंडा हे गुरुवारी (दि.२५) सकाळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेताजवळ असलेल्या लक्ष्मीबाई नरूटे यांच्या शेततलावातून पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान शेत तलावातील पाण्याची पातळी खाली गेली होती. रामगोंडा हे शेत तलावातील पाणी काढत असताना तोल गेल्याने पाय घसरून शेतालावात पडले. यावेळी शेत तलावाजवळ असलेल्या एका मुलाने सदरची घटना रामगोंडा यांच्या घरी सांगितली. रामगोंडा यास पोहता येत नव्हते. परिणामी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदान करण्यात आले.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news