HSC Result: गतवर्षीच्या तुलनेत परभणीचा बारावीचा निकाल 6 टक्क्यांनी घसरला; एकूण निकाल 86.94 टक्के | पुढारी | पुढारी

HSC Result: गतवर्षीच्या तुलनेत परभणीचा बारावीचा निकाल 6 टक्क्यांनी घसरला; एकूण निकाल 86.94 टक्के | पुढारी

परभणी, पुढारी वृत्तसेवा : (HSC Result) बारावीच्या परिक्षेत गतवर्षीच्या तुलनेत जिल्हयाच्या निकालात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षी सर्व शाखांचा निकाल 93.25 टक्के इतका होता. पण, यावर्षी तो 86.94 टक्क्यांवर आल्याने तब्बल 6.33 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्हयांमध्ये परभणीचे स्थान चौथ्या क्रमांकावर राहिले. यावर्षीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुली उत्‍तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. (HSC Result)

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक: (HSC Result)

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 94.95 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा 91.36 तर कला शाखेचा निकाल 86.90 टक्के इतका राहिला आहे. जिल्हयात कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम व तंत्रविज्ञान अशा 5 शाखांसाठी नियमीत, खाजगी, आयसोलेटेड व सीआयएसमधील 24 हजार 661 विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 23 हजार 956 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. त्यातून 20 हजार 828 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 86.94 टक्के इतके आहे.

नियमीत विद्यार्थ्यांमध्ये अर्ज दाखल केलेल्या 13 हजार 876 मुलांपैकी 13 हजार 436 मुलांनी प्रत्यक्ष परिक्षा दिली. त्यातील 11 हजार 329 मुले उत्‍तीर्ण झाली आहेत. नियमीत 10 हजार 590 अर्ज दाखल केलेल्या मुलींपैकी 10 हजार 328 मुलींनी परिक्षा दिली असून, त्यातील 9 हजार 458 मुली उत्‍तीर्ण झाल्या आहेत. एकुण 20 हजार 787 मुले व मुली उत्‍तीर्ण झाले असून त्यांची ही टक्केवारी 87.47 इतकी आहे. (HSC Result)

प्रायव्हेट विद्यार्थ्यांमध्ये अर्ज दाखल केलेल्या सर्वच्या सर्व 11 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यामध्ये 8 पैकी चार मुले उत्‍तीर्ण झाली तर तीन पैकी एक मुलगी उत्‍तीर्ण झाली असे एकुण 5 जण उत्‍तीर्ण झाले असून हे प्रमाण 45.45 टक्के इतके आहे. आयसोलेटेड 136 विद्यार्थ्यांचा निकाल शुन्य लागला आहे. तर सीआयएस पध्दतीने परिक्षा देणार्‍या 48 पैकी 45 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. त्यात मुले 24 तर मुली 12 असे एकुण 36 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. यांची टक्केवारी 80 टक्के इतकी आहे.

किमान कौशल्यावर आधारितचा निकाल चांगला:

किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचा निकाल 88.35 टक्के इतका लागला आहे. यातही मुलींनी 89.65 टक्के निकाल मिळवून अग्रेसर राहण्याचे काम केले. मुलांची टक्केवारी87.11 टक्के इतकी आहे. आयटीआय तंत्रविज्ञान शाखेचा निकाल 83.42 टक्के लागला.

 

हेही वाचा:

Back to top button