Ashish Vidyarthi wedding : आशिष विद्यार्थी वयाच्या साठीत चढले बोहल्यावर, आसामची रुपाली बनली प्रितीची राणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआ हिच्याशी विवाह केला आहे. आशिष यांनी गुरुवारी (दि.२५) रजिस्टर पद्धतीने लग्नगाठ बांधली. आशिष विद्यार्थी यांचा हा दुसरा विवाह आहे. विवाह प्रसंगी बोलताना, विद्यार्थी म्हणाले, रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (Ashish Vidyarthi wedding)
गुरुवारी (दि.२५) कोलकातामध्ये हा विवाह पार पडला. यावेळी नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार दोघांकडून नातेवाईक आणि मित्रांसाठी रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी यांची पत्नी आसामच्या फॅशन इंडस्ट्रीशी संलग्न आहे. गुवाहाटीची राहिवासी असणारी रुपाली कोलकातामधील एका फॅशन दुकानाची मालकीन आहे. (Ashish Vidyarthi wedding)
आशिष विद्यार्थी विवाह प्रसंगी बोलताना म्हणाले, "आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी विवाहबद्ध होणे ही असामान्य गोष्ट आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले. सध्याकाळी आम्ही रिसेप्शन ठेवणार आहोत. त्याच्या प्रेमाविषयी बोलताना विद्यार्थी म्हणाले, ही मोठी गोष्ट आहे. मी नंतर केव्हा तर सांगेल. तर याबाबत बोलताना रुपाली म्हणाली, आम्ही काही काळापूर्वीच भेटलो होतो आणि आमच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. (Ashish Vidyarthi wedding)

