सांगली : बांबवडेत १५ ऑगस्टला रंगणार दोन ठिकाणी कुस्ती मैदान

सांगली : बांबवडेत १५ ऑगस्टला रंगणार दोन ठिकाणी कुस्ती मैदान
Published on: 
Updated on: 

पलूस, पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ ऑगस्टला कुस्ती मैदान भरवण्याची परंपरा तालुक्यातील बांबवडे गावाला आहे. परंतु, ७५ वर्षात पहिल्यांदाच स्थानिक राजकीय मतभेदातून १५ ऑगस्टला होणारे कुस्ती मैदान हे दोन ठिकाणी होणार आहे. 00 पै.सिकंदर शेख हा आमच्याच मैदानात खेळणार असे दोन्ही आयोजक दावा करत आहेत. त्यामुळे पै.सिकंदर कुठल्या मैदानात खेळणार याकडे कुस्ती शौकीनांचे लक्ष लागले आहे.

"बांबवडे कुस्ती मैदान कमिटी " यांच्या माध्यमातून गावातळ्या नजीक तर उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून गावात मैदान घेतल्याने आमने – सामने चित्र पाहायला मिळणार आहे. बांबवडे कुस्ती मैदान कमिटी च्या माध्यमातून गावातळ्या नजीक जय्यत तयारी केली
असल्याची माहिती जयभवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा बांबवडे कुस्ती मैदान कमिटी अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव पाटील यांनी दिली. दुसरीकडे पाऊस पडला तरी मैदान व्हावे. यासाठी उत्कर्ष क्रीडा मंडळ यांनी संपूर्ण मैदानाला छत घालण्याचे काम सुरु केले आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news