Hockey JAP vs IND : भारताची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक, जपानचा ५-० ने उडवला धुव्वा | पुढारी

Hockey JAP vs IND : भारताची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक, जपानचा ५-० ने उडवला धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉकीच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीत भारतीय संघाने जपानचा ५-० ने पराभव केला. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. या विजयासह भारताने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारत मलेशिया विरुद्ध खेळणार आहे. मलेशियाने पहिल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ६-२ असा पराभव केला. (Hockey JAP vs IND)

Hockey Japan vs India : भारताचा नेत्रदीपक विजय

भारताने उपांत्य फेरीत जपानचा ५-० असा पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतीय संघाने साखळी फेरीतील पाचपैकी चार सामने जिंकले होते. जपानविरुद्ध एकमेव ड्रॉ सामना खेळला होता. आता अंतिम फेरीत मलेशिया विरुद्ध सामना होईल. या संघाचा गट फेरीत टीम इंडियाने ५-० ने पराभव केला. (Hockey JAP vs IND)

भारत पाच वर्षांनंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने २०१८ मध्ये अंतिम फेरीत धकड मारली होती. त्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानसोबत संयुक्त विजेता ठरली होती. त्याच वेळी, संघ २०११ आणि २०१६ मध्ये चॅम्पियन बनला. भारत पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. २०१२ मध्ये तो केवळ विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाला होता. जपानबद्दल बोलायचे झाले तर २०२१ मध्ये उपविजेते होते, परंतु यावेळी उपांत्य फेरीत बाहेर पडले. (Hockey JAP vs IND)

हेही वाचलंत का?

Back to top button