सांगली : महिलेला मंदिरात प्रवेश नाकारला

खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील घटना; दोघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी
Crime News
महिलेला एका मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.file photo
Published on
Updated on

विटा : तुम्हाला मंदिराच्या आत प्रवेश नाही, आता आमचा नियम सुरू झाला आहे. तुम्ही महादेवाला हात लावायचा नाही, असे म्हणत एका माहेरवाशिणीला मंदिरातून चक्क हाताला धरून बाहेर काढले. सांगली जिल्ह्यात खुर्द रेवणगाव (धोंडगेवाडी) गावात ही घटना घडली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात शोभा पांडुरंग सूर्यवंशी आणि महादेव मारुती सूर्यवंशी (दोघेही रा. खुर्द रेवणगाव (धोंडगेवाडी) यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News
सांगली : दुचाकीला डंपरची धडक; तरुणाचा मृत्यू

खुर्द रेवणगाव (धोंडगेवाडी) गावची रहिवासी असलेली सुवर्णा विकास रास्ते (वय 30, रा. ओंकार सोसायटी, देहू-आळंदी रोड, ता. हवेली, जि. पुणे) या सात-आठ महिन्यांपासून त्यांच्या माहेरी आई तुळसाबाई सीताराम माने, वडील सीताराम संभाजी माने आणि मुलगा पृथ्वीराज विकास रास्ते यांच्याबरोबर राहत आहेत. सोमवारी, 19 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवारनिमित्त सकाळी सुवर्णा या गावातील काळभैरव मंदिरातील महादेवाच्या पिंडीस पाणी घालण्यास गेल्या होत्या. तेव्हा याच गावातील शोभा सूर्यवंशी यांनी त्यांना हटकले.

Crime News
सांगली : खूनासाठी दिली सहा लाखांची सुपारी; रिवॉल्वर चालवण्याचेही दिले प्रशिक्षण

‘आम्ही देवाला अभिषेक घातला आहे. आता तू देवाला पाणी घालायचे नाहीस, तुला पाणी घालायचे असेल तर पिंडीच्या पुढे पाणी ओतून जा’, असे सुनावले. मात्र त्याचवेळी गावातील दुसर्‍या समाजाच्या महिला आल्या, त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करीत होत्या. त्यावर सुवर्णा यांनी शोभा यांना विचारले की ‘तुम्ही मलाच का अडवत आहात?’ त्यावर शोभा यांनी गावातील महादेव मारुती सूर्यवंशी यांना सांगितले की, ही खालच्या जातीची पोरगी बघा, कसा कालवा करायला लागली आहे?, असे म्हणत तुम्हाला मंदिराच्या आत प्रवेश नाही, तुम्ही देवाला हात लावायचा नाही, असे म्हणत सुवर्णा यांना मंदिरातून हाताला धरून बाहेर काढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news