सांगली : दुचाकीला डंपरची धडक; तरुणाचा मृत्यू

मणेराजुरी-योगेवाडी रस्त्यावरील घटना : एक गंभीर
A dumper hit a two-wheeler; Death of a young man
दुचाकीला डंपरची धडक; तरुणाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

मणेराजुरी - योगेवाडी रस्त्यावर मोटारसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. पवन विष्णू माने (वय 26, रा. योगेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर सुरेश बजरंग माने (27, रा. योगेवाडी) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा घडला.

A dumper hit a two-wheeler; Death of a young man
नाशिक : नांदुरी अभोणा रस्त्यावर एसटी बसला अपघात

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी : पवन माने व सुरेश माने हे त्यांच्या मोटारसायकलवरून (एमएच 10 बीपी 9570) मणेराजुरीतील काम संपवून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास योगेवाडीकडे चालले होते. मोटारसायकल मणेराजुरी हद्दीतील एका वळणावर आली असता, पाठीमागून आलेल्या अज्ञात डंपरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेने मोटारसायकलवरील दोघेही रस्त्यावर आपटले. मोटारसायकलस्वार पवन याच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने रक्तस्राव होऊन पवन याचा जागेवरच मृत्यू झाला, तर सुरेश याच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर डंपरचालक डंपरसह कवठेमहांकाळच्या दिशेने पसार झाला.

A dumper hit a two-wheeler; Death of a young man
Gadag Accident : गदग जवळ बस-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्‍यू

पोलिस 2 तासांनी घटनास्थळी

घटना घडून दोन तास झाले तरी पोलिस घटनास्थळी आले नसल्याने भर पावसात जखमीचे नातेवाईक रस्त्यावर थांबून होते. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news