सांगली : खूनासाठी दिली सहा लाखांची सुपारी; रिवॉल्वर चालवण्याचेही दिले प्रशिक्षण

सांगलीतील तरुणाचे गुढ उकलले
Sangli Murder Case
खुनात अटक केलेल्या संशयितांच्यासह पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिषचंद्र गावडे व पोलीस पथकPudhari Photo
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव येथील पांडुरंग भगवान शीद यांचा सुपारी देऊन काटा काढल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित सुरेश नारायण ताटे ( वय ४५ रा. इस्लामपूर )याच्यासह त्याच्या दोन साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने तिघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली रिवॉल्वर लवकरच हस्तगत करुन व त्यामागचे कनेक्शनही शोधू असे, पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.

Sangli Murder Case
कासेगावातील खून अनैतिक संबंधातून?

विशाल जयवंत भोसले (वय.२५ रा. कामेरी ) शिवाजी भिमराव भुसाळे ( वय. ३७ रा. मुळ कर्नाटक , सध्या इस्लामपूर) अशी अटक केलेल्या अन्य दोन संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी (दि.१६) कासेगाव - वाटेगाव रस्त्यावर ‍पांडूरंग शिद याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेत पांडूरंग यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

Sangli Murder Case
Accident : दुर्दैवी ! वाढदिवशीच तरुणाचा अपघाती मृत्यू

संशयितांच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिषचंद्र गावडे , गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव, इस्लामपूर, कुरळप - शिराळा पोलीस ठाण्यांचे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अशी चार पथके नेमण्यात आली होती. चौकशीत मयत पांडुरंग याचा नातेवाईक सुरेश ताटे याचे नाव पुढे आले. यानंतर त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने आपणच सुपारी देवून हा खुन केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दोन साथिदारांना आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटर सायकलही ताब्यात घेतली आहे.

नातेवाईकानेच दिली ६ लाखांची सुपारी

पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण म्हणाले, संशयित सुरेश ताटे आणि मयत पांडुरंग हे ऐकमेकांचे नातेवाईक आहेत. पांडुरंगचे आपल्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध आहेत असा संशय सुरेशला होता. त्यामुळे वर्षभरापासून पांडूरंग याचा काटा काढण्याचा प्लॅन सुरेश करीत होता. तो ज्या गँस एजन्सीत काम करीत होता तेथील दोघांना त्याने खून करण्यासाठी ६ लाखांची देवून तयार केले होते. पैशाच्या आमिषाने विशाल व शिवाजी खुन करण्यास तयार झाले. त्यांनी दोन दिवस पांडुरंगवर नजर ठेवली आणि संधी मिळताच त्याला गोळ्या झाडून त्याचा खून केला.

Sangli Murder Case
नांदेड : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला भावाचा निर्घृण खून

असा झाला खुनाचा उलगडा

या खुनाचा तपास करत असताना पोलिसांना सुत्रांकडून माहिती मिळाली की, गत वर्षभरापासून सुरेश ताटे हा रिवॉल्वर कोठे मिळते यासाठी वारंवार चौकशी करत होता. तसेच खुनाची सुपारी कोण घेतय का ? याची चौकाशी करीत होता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.तसेच खुनासाठी ५० हजाराला रिवॉल्वर खरेदी केल्याचेही त्याने सांगितले.

Sangli Murder Case
सातारा : नागठाणेत ठेकेदाराने केला मजुराचा खून

युट्युबवर घेतले रिवॉल्वर चालविण्याचे प्रशिक्षण

खून करण्यामध्ये सहभागी असलेल्या दोन संशयित आरोपींनी रिवॉल्वर दिल्यानंतर ते चालविण्याचे प्रशिक्षणही सुरेश ताटे यानेच युट्युबवर व्हिडिओ बघून दिल्याचे त्यांनी सांगितले. ताटे याने हे रिवॉल्वर कोठून खरेदी केले आणि ते कनेक्शन कुठेपर्यंत आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news