सांगली : सोरडी येथे शाळेच्‍या छताचे प्लॅस्टर कोसळले ; विद्यार्थी जखमी

सांगली : सोरडी येथे शाळेच्‍या छताचे प्लॅस्टर कोसळले ; विद्यार्थी जखमी
Published on
Updated on

जत, पुढारी वृत्तसेवा : सोरडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून प्लास्टर बेंचच्या पुढील बाजूस पडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही.  हा प्रकार निकृष्ट बांधकामामुळे घडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार , शाखा अभियंता व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आराध्य आरुण आभ्यागे (वय ७)असे आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोरडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे वर्ग भरतात. इयत्ता पहिलीच्या वर्ग खोलीच्या स्लॅबचा सीलिंगचा काही भाग कोसळला. हा भाग बेंचच्या पुढील बाजूवर पडला. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत शिक्षकाने विद्यार्थ्यांना तत्काळ व्हरांड्यात जाण्यास सांगितले.

हेही वाचलंत ? 

पाहा व्हिडिओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news