तासगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील व राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यामध्ये आणि राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळेल. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हाच राज्यातील एक नंबरचा पक्ष राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे सदस्य रोहित आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला. आज (दि. १८) अंजनी (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते.
या वेळी रोहित पाटील म्हणाले, राज्यात ७ हजार ७५१ आणि सांगली जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. राज्यातील भाजप आणि शिंदे गटाचे सरकार जनहित विरोधी निर्णय घेत आहे. त्यांचे वाचाळवीर नेते दररोज महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. या जनहिताच्या विरोधातील कारभाराला जनता वैतागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना भरभरून मतदान करेल. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना घडवीत यश मिळेल. असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
हेही वाचा :