

जत: पुढारी वृत्तसेवा: माडग्याळ (ता.जत) येथे सिंगल फेज विद्युत मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू झाला. राजश्री बसवराज नाटेकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, माडग्याळ ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा चार वाजता सुरू केला होता. यावेळी राजश्री नाटेकर या विद्युत मोटार सुरू करत होत्या. दरम्यान, विद्युत प्रवाहाचा शॉक लागला. त्यांना माडग्याळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याचे पुढील उपचारासाठी जत येथे घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, राजश्री हिचा रस्त्यातच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालय जत येथे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या पश्चात पती व दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे. पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत.
हेही वाचा