Anil Babar: सांगलीत शेतमाल तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी १७ कोटींचा निधी : आमदार बाबर | पुढारी

Anil Babar: सांगलीत शेतमाल तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी १७ कोटींचा निधी : आमदार बाबर

विटा : पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाने सांगलीत कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे. (Anil Babar)

आमदार बाबर म्हणाले की, कीटकनाशक उर्वरित अंश विरहित शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. युरोपीय देशात द्राक्ष, डाळींब यासारख्या फळांची निर्यात करण्यासाठी कीटकनाशकांचा अंश तपासणी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. म्हणून शासनानेही कीटनाशक उर्वरित अंश तपासणीची सक्ती केली आहे. यासाठी कीटकनाशक अंश तपासणीच्या शासकीय प्रयोगशाळा पुणे आणि नागपूर येथेच आहेत, पण तेथील तपासणी खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. या तपासणीसाठी सांगली जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती.  (Anil Babar)

त्यामुळे आपण सांगलीत प्रयोगशाळा उभारण्यासाठी सरकारकडे मागणी केली होती. त्यावर राज्य शासनाने सांगली आणि नाशिक जिल्ह्यासाठी अशा कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळा मंजूर केल्या आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी १७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. सांगली येथील प्रयोगशाळेचा फायदा सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील शेतक-यांना होणार आहे, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button