

जत (सांगली), पुढारी वृत्तसेवा : वन्य प्राण्यांची शिकार करून प्राण्यांचे व हत्तीचे हस्तीदंताची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्याकडील वीस लाख किंमतीचे हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी राहुल भीमराव रायकर (वय.२६) रा. आमे गल्ली, संकपाळ गल्ली कसबा बावडा कोल्हापूर, बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय.३०) रा. विजयनगर .कोल्हापूर, कासिम शमशूमुद्दीन काझी (वय.२०) रा. खाजा वस्ती. मिरज, हणमंत लक्ष्मण वाघमोडे (वय ३९, रा. पांडेगाव, ता. अथणी, जि. बेळगाव) असे तस्करी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठेमंहकाळ तालुक्यातील खारसिंग गावाच्या हद्दीतील दंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही करवाई केली. पोलिसांनी चौघांना अटक करून या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हस्तीदंताची व विविध प्राण्यांच्या दाताची तस्करी करणारी टोळी हस्ती दंत विक्रीसाठी दंडोबा डोंगराजवळ येणार आहे अशी माहिती सुत्रांनी पाेलिसांना दिली हाेती. त्यानूसार दंडोबा डोंगर या ठिकाणी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फारसिंग ते दंडोबा वन्य डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आरोपी झाडाझुडपात लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील वीस लाख किंमतीचे हस्तिदंत जप्त केले. याबाबत पुढील कारवाई पोलीस करत आहेत.