भंडारा: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा गजाआड | पुढारी

भंडारा: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा गजाआड

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवर काढलेल्या अश्लिल फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करुन गेल्या चार वर्षापासून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हर्षदीप मुकुंद नंदेश्वर (१९) रा. बाम्पेवाडा असे आरोपीचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या एका लग्नात अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली. त्याने तिच्याशी सलगी वाढवून प्रेमसंबंध स्थापित केले. दरम्यान तिचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. यानंतर तो मुलीला सतत ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण करू लागला. त्याने अनेकवेळा तिच्याशी शरीरसंबंध ठेवत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्याचा प्रकार सुरू ठेवला होता. एक दिवस मुलीची आई घरी नसल्याचे समजून आरोपी हर्षदीप हा अल्पवयीन पीडित मुलीच्या घरी गेला. तिला एकटी पाहून अश्लील चाळे करायला लागला. इतक्यात घरातच असलेल्या पीडित मुलीच्या आईने हा प्रकार बघितला. मुलीला घेवून पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी आरोपी हर्षदीप नंदेश्वर याला अटक करून पोस्को, आयटी अ‍ॅक्ट, ब्लॅकमेल, कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button