

सांगली : शहरातील शामरावनगर येथे घरात घुसून पाच जणांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मुदस्सर सलीम बागवान यांनी पहिल्या पत्नीच्या नातेवाईकाविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पहिल्या पत्नीची बहीण ताहेरून अल्फाज बागवान, फिजा जुबेर बागवान, तमन्ना तोहिद बागवान, रेश्मा राजू शेख आणि तोहिद अल्फाज बागवान (सर्व रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
मुदस्सर व त्यांचे कुटुंबीय दि. 3 रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास शामरावनगर येथील स्वस्तिक सदनिकेतील त्यांच्या घरात होते. त्यावेळी मुदस्सर यांच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले. त्यांनी संपूर्ण कुटुंबास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत विचारणा केली असता घरात घुसून मुदस्सर यांच्यासह त्यांची आई शमीम सलीम बागवान, बहीण निहार अमीन बागवान, भाऊ मुजफ्फर सलीम बागवान आणि दुसरी पत्नी शबनम यांना मारहाण केली. याबाबत मुदस्सर बागवान यांच्या फिर्यादीनुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.