

Pune Graduate Constituency Election
ईश्वरपूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हे उच्चशिक्षित तसेच विद्यार्थी,शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना विजयी करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या उमेदवारांना सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक मदाधिक्य देवू अशी ग्वाही, भाजपचे जिल्हाअध्यक्ष सम्राट महाडिक यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ पेठ येथील महाडिक शिक्षण संकुलात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजप जिल्हा प्रभारी वर्षा डहाळे, शरद लाड, जि प सदस्य जयराज पाटील, पंचायत समिती सदस्य राजन महाडिक, शुभम पाटील,समर्थ पाटील, प्रदीप कांबळे, प्रसाद पाटील, अशोक पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक,नगरसेवक अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, केदार नलवडे,चेतन शिंदे, मंडल अध्यक्ष संदीपराज पवार,अमोल पडळकर, अर्जुन साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
राहुल महाडिक म्हणाले, डॉ. स्मिताताई जाधव यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे. सामाजिक कार्यातही त्या सक्रिय आहेत. कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांचे त्यांनी मोठे संघटन केले आहे. महाडिक कुटुंबाने या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. शिराळा वाळवा तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देवू.
डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम केले आहे. भविष्यात दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच नवपुत्री कार्यक्रम हातात घेऊन पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. शरद लाड यांनी माघार घेऊन मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. महाडिक बंधूंची ताकद पाठीशी असल्यामुळे विजयाची खात्री आहे.
जिल्हा सरचिटणीस डॉ. सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वरूप पाटील यांनी आभार मानले.