सांगली : मनोरुग्ण महिलेकडून चाळीस वाहनांची तोडफोड

सांगली : मनोरुग्ण महिलेकडून वाहनांची तोडफोड; ४०हून अधिक वाहनांचे नुकसान
sangli news
सांगली : मनोरुग्ण महिलेकडून चाळीस वाहनांची तोडफोडpudhari photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पांजरपोळ परिसरात रस्त्याकडे लावलेल्या सुमारे चाळीसहून अधिक वाहनांची मनोरुग्ण महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. संतप्त नागरिकांनी तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

गुरुवारी रात्री स्टेशन चौकात एक मनोरुग्ण महिला हातात लाकडी दांडके घेऊन उभी होती. तिने काही वेळातच रस्त्याकडेला लावलेली वाहने दांडक्याने फोडण्यास सुरुवात केली. स्टेशन चौक ते पांजरपोळपर्यंत या महिलेने सुमारे चाळीसहून अधिक वाहनांची तोडफोड केली. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिचा पाठलाग सुरू केला. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडून कुपवाड येथील मनोरुग्ण केअर सेंटरमध्ये दाखल केले.

पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार

जागतिक मानसिक आरोग्यदिनी हा प्रकार घडला. मनोरुग्ण महिलेने दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याने बराच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर महिलेवर संतप्त नागरिकांनी हल्ला केला असता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. याची दखल घेऊन मनोरुग्ण सेंटरमध्ये तिला दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

sangli news
सांगली : मनोरुग्ण महिलेकडून मूर्तीचा भंग; मिरजेतील प्रकार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news