सांगली : विश्वास नाईक कारखान्याच्या चेअरमनपदी मानसिंगराव नाईक  

सांगली : विश्वास नाईक कारखान्याच्या चेअरमनपदी मानसिंगराव नाईक  

शिराळा ; पुढारी वृत्तसेवा

विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांची सलग पाचव्यांदा अनुक्रमे अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक या प्रमाने दोनच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची तर, उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची निवड झाल्याचे जाहिर केले. त्यांनी नूतन अध्यक्ष, उपध्यक्षांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

यानंतर विश्वास कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीन पार पाडल्याबद्दल संचालक मंडळातर्फे प्रांताधिकारी खिलारीसाहेब, तहसीलदार गणेश शिंदे व सहकारी संस्थाचे सहय्यक निबंधक डी. एस. खताळ यांचा आमदार नाईक व उपाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नाईक यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर निवडीचा कार्यक्रम संपला. यानंतर नूतन अध्यक्ष, आमदार नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार पाटील यांचा कामगार संघटनंच्यावतीने शाल, फेटा व पुष्पहार देवून सत्कार झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news