मिरज : रेल्वे चालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या | पुढारी

मिरज : रेल्वे चालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

मिरज. पुढारी वृत्तसेवा 

मिरज-बेळगाव रेल्वेमार्गावर म्हैसाळ रेल्वे उड्डाणपुलाजवळ रेल्वे इंजिन चालक के. अनंत पद्मनाभ आचार्यलु (वय 45, सध्या रा. प्रथमेश अपार्टमेंट, रेल्वे स्टेशनजवळ ,मिरज. मुळगाव हैदराबाद, आंध्रप्रदेश) यांनी रविवारी मध्यरात्री रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

के. आचार्यलु हे आंध्र प्रदेश येथील असून त्यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागतील मिरज रेल्वे स्थानकात चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते मिरजेत कार्यरत होते. परंतु रविवारी मध्यरात्री त्यांनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

रेल्वेखाली आल्याने आचार्यलु यांचे शरीराचे दोन तुकडे होऊन छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडला होता. त्यांच्या मृतदेहावर मिरज शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. आचार्यलु यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. परंतु त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button