ऐतवडे बुद्रूकः पुढारी वृत्तसेवा : येथील विहीर बागायत शेतकर्यांनी सुमारे 40 हेक्टर रब्बी हरभर्याचा पेरा केला. खरीप गेला रब्बी पदरात पडेल, या आशेने महागडी बियाणे खरेदी करून पेरा केला. त्याची उगवण जोमात झाली. फुलोर्यात आलेला हरभरा घाटेअळी सह विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे हे पीक हातचे जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ऐतवडे बुद्रूक, कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी परिसरात खरीप रब्बी पिकांचा अधिक समावेश असतो. परंतु अलीकडील या नियमित चक्रावर यंदा नवीनच संक्रात ओढविली आहे. सोयाबीन पिकाने यावर्षी एकाच हंगामात 'कोरडा अन् ओला'दुष्काळ सोसला. पहिल्या महिन्यात पावसाअभावी पाण्याचा असह्य सहन झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला.( घाटेअळी )
कृषी विभागाने तत्काळ संबंधित शेतकर्यांच्या पिकांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. अनेक शेतकर्यांच्या हरभरा पिकांना विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे मर लागली आहे. घातलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.( घाटेअळी )
( घाटेअळी ) शेतकर्यांना भरपाई मिळावी…
शेतकर्यांनी 40 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी टोकण केली आहे. शासनाने नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई मिळवून द्यावी. गावागावांत नुकसान भरपाईसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनी सांगितले. ( घाटेअळी )