

सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगलीच्या कृष्णा नदीवरील बंधारा हटविण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींनी आज (दि.५) विरोध दर्शविला. बंधारा बचावासाठी सांगलीकर एकवटले असून, त्यांनी बंधाऱ्यावर मानवी साखळी करत विरोध दर्शविला आहे. पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात सांगलीवाडीजवळ कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे सांगलीकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. याचसोबत कृष्णेच्या पात्रात सांडपाणी मिसळत नाही. मात्र, बंधारा काढला तर कृष्णेचे पात्र दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच महापूराच्या काळात सुद्धा पाण्याची पातळी वाढून शेतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने सांगलीतील नागरिकांनी बंधारा पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
हेही वाचलंत का?