Jayant Patil| आष्ट्यात नैतिकतेचा विजय : आ. जयंत पाटील

जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला
Jayant Patil
Jayant Patil
Published on
Updated on

आष्टा : आष्टा शहर विकास आघाडीने चोवीसपैकी तेवीस जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. हा नैतिकतेचा विजय आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. नूतन नगराध्यक्ष विशाल शिंदे व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा व विजयी आभार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Jayant Patil
Jayant Patil: ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्यांनी शहराला काय दिले?

आमदार पाटील म्हणाले, हा विजय एका व्यक्तीचा नसून सर्व कार्यकर्त्यांचा आहे. प्रभागनिहाय संघटन, युवकांची मेहनत आणि मतदारांची विकासाला दिलेली साथ निर्णायक ठरली. आष्टा शहर विकास आघाडीला 24 पैकी 23 जागांवर विजय मिळवून दिला. नगराध्यक्ष विशाल शिंदे 2700 मताधिक्याने निवडून येणे, हे लोकांच्या विश्वासाचे द्योतक आहे. अंतर्गत विसंवाद, स्वार्थी राजकारण व अहंकारामुळे विरोधक अपयशी ठरले.

आमदार पाटील म्हणाले, प्रत्येक प्रभागात नगराध्यक्ष व नगरसेवक थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पाणी, रस्ते, गटारी, वीज, स्वच्छता यावर प्राधान्याने काम करण्यात येईल. सर्व्हे नं. 4, 6, 9 चा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहोत. पाणी पुरवठ्याची नवी योजना गतीने पुढे नेणार आहोत. नशामुक्त आष्ट्यासाठी कठोर भूमिका घेऊन नशेचे अड्डे व अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. पोलिस प्रशासनाला विश्वासात घेऊन संयुक्त मोहीम राबवणार आहोत. तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या प्रवृत्तींना यापुढच्या काळात थारा दिला जाणार नाही. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे म्हणाले, हा ऐतिहासिक विजय आहे. आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. जादूटोण्याने नव्हे तर जनतेप्रती असलेल्या विश्वासाने जिंकलो. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस्‌‍ कॉम्प्लेक्स, पाणी योजना मार्गी लावू. काकासाहेब शिंदे सभागृहाचे नाव बदलण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण याच सभागृहात आमच्या नगराध्यक्षांनी पदभार घेतला.

नगराध्यक्ष विशाल शिंदे म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून सत्तेवर आलो. 24 तास पाणी देणार, रस्ते, वीज, ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करु. विलासराव शिंदे यांनी ठेवलेला 9 कोटीपैकी 6 कोटी नफा फंड प्रशासनाने वापरला. आता शहरात जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फंडाची व्यवस्था करून विकास कामे करणार आहोत. विलासराव शिंदे यांच्या स्वप्नातील आष्टा हे जिल्ह्यातील आदर्श शहर बनविणार आहोत. 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा पहिला ठराव पालिकेत करणार आहोत. आ. जयंत पाटील यांनी या निवडणुकीत घेतलेले अविश्रांत कष्ट, शिंदे घराण्यावर जनतेने केलेले प्रेम कधीच विसरणार नाही. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे, विद्या शिंदे, धैर्यशील शिंदे, विश्वराज शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Jayant Patil
Jayant Patil : सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news