Jayant Patil | ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या आत बाहेर कॅमेरे लावा : जयंत पाटील

सांगलीच्या आष्टा येथे स्ट्राँग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
Jayant Patil demand
Jayant Patil Pudhari
Published on
Updated on

CCTV cameras in EVM strongroom

सांगली : ईव्हीएम मशीन ठेवलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्ट्राँग रूमच्या आत बाहेर कॅमेरे लावावेत. तसेच जनतेला दिसेल असा एलसीडी बाहेर ठेवावा. ईव्हीएम वर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही, बाहेरून या मशीन ऑपरेट होत असतात, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी जामर सुद्धा लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

सांगलीच्या आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आष्टयात स्ट्राँग रूम बाहेर आंदोलन केले होते, दुपारपासून शेकडो कार्यकर्ते हे ठिय्या मारून होते. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत 2 हजार मतांची तफावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती घेतली,

Jayant Patil demand
Jayant Patil: इस्लामपुरातील मतदार यादीतही घोळ : जयंत पाटील

मराठी पंतप्रधान होणार या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर ते म्हणाले की, सध्या गल्लीतला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या निवडणुका झाल्यावर आंतरराष्ट्रीय प्रश्नाचा विचार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पृथ्वीराज चव्हाण यांना मी भेटून माहिती घेऊन मग माध्यमांशी बोलेन. एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा, कानडी व्हावा, असे हवेतल्या गप्पा आम्ही कशा मारणार.

निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला आहे. तशा निवडणुका होतात हे निवडणूक आयोगाला माहीत नाही. ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलना बऱ्याच लोकांचे नुकसान होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याचिका दाखल करून मागणी केली असेल तर त्याचा काय निर्णय लागेल ते बघू, पण ज्यांचे मतदान झाले नाही, त्यांची मागणी असेल, काय निर्णय होतो ते बघू.

Jayant Patil demand
Jayant Patil: जयंत पाटील विरोधकांचा एल्गार

निवडणुका वेळी भानामतीचे जे प्रकार झाले त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. स्ट्रॉंग रूमची मी पाहणी केली. पण या वीस दिवसांत काही होऊ नये, अशी आम्ही आशा करतो. एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल लोकांचा विश्वास उडलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाबद्दल असे प्रकार झाले. तर त्यांच्यावरचा विश्वास उडू शकतो, त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news