Gopichand Padalkar : 'तुमचे ब्रॅण्डेड कपडे फडणवीस यांच्यामुळे'

सुहास बाबर यांच्यावर पडळकर यांची टीका
Gopichand Padalkar
आ. गोपीचंद पडळकरFile Photo
Published on
Updated on

विटा ः आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या कथित टिकेवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, याला दम दे, त्याला दम दे , एखाद्या वायरमनला दम दे, हे आमदाराचे काम आहे काय? सत्तेचा माज एवढा चांगला नसतो. रावणाला माज आला, त्याची लंका जळून गेली. तुम्ही-आम्ही बघतोय, इतिहास वाचतोय, अरे जर रावणाची लंका राहत नसेल तर तुम्ही-आम्ही कोण आहे? काय आहे आपल्याकडे?

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar | कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर गाठ माझ्याशी : आमदार गोपीचंद पडळकर

ते म्हणाले, आज तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोलायला लागला. ते पण अरे-तुरेत. इतका माज आला का? अरे आज जे तुमच्या अंगावर ब्रॅण्डेड कपडे दिसतात, ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आहेत. 2019 ला जर तुम्ही माणसात आला नसता ना, तर तुम्हाला राजकारणात पण विचारलं नसतं. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाले. तुम्ही त्यांच्याबद्दल अरे-तुरे बोलता? आमच्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत. अरे तुमची क्षमता काय? आपली लायकी काय? आपण आपल्या लेव्हलला बोललं पाहिजे. मला काय बोलायचंय मी माझ्या लेव्हलला बोललं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर घसरायला लागलाय? आता फार झालं.

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar : जत कारखाना सभासदांना परत द्या; अन्यथा धुराडे पेटू देणार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news