सांगली : ‘संभाजी महाराज पुतळ्याची जागा निश्‍चित करा’

सांगली : ‘संभाजी महाराज पुतळ्याची जागा निश्‍चित करा’

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  सांगलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. त्यासाठी समिती नियुक्‍त करावी. त्यासंदर्भात आठ ते दहा दिवसात विशेष महासभा आयोजित करावी, अन्यथा महापालिका आवारात धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिला आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना मंगळवारी भाजप युवा मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय यमगर, इमरान शेख, युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, उपाध्यक्ष अमित गडदे, सचिव अनिकेत खिलारे, विद्यार्थी आघाडीचे सिद्धांत काटकर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धीरज सूर्यवंशी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणे आवश्यक आहे. त्याबाबत विविध संघटना तसेच सांगली शहरातील नागरिकांची मागणी पाहता विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये विशेष महासभेचे आयोजन न केल्यास महापालिका आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news