Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव पदवीधरांच्या हक्काचा आवाज बनतील : माजी मंत्री शिवाजीराव नाईक

Pune Graduate Constituency Election : ‘यशवंत उद्योग समूहाची ताकद डॉ. स्मिताताईंच्या पाठीशी’
Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव पदवीधरांच्या हक्काचा आवाज बनतील : माजी मंत्री शिवाजीराव नाईक
Published on: 
Updated on: 

शिराळा : ‘पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव या सुसंस्कृत आणि उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व आहेत. शिराळा हे त्यांचे माहेर असल्याने या मातीशी त्यांचे रक्ताचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. . दिवंगत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांचा समृद्ध वैचारिक वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत,’ असा ठाम विश्वास माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी शिराळा येथील नामांकित 'यशवंत उद्योग समूहा'ला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित संवाद मेळाव्यात शिवाजीराव नाईक बोलत होते. "महायुतीने एका कर्तृत्ववान महिलेला संधी दिली असून, त्या पदवीधरांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन ते तडीस नेतील. यशवंत उद्योग समूहातील सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहतील," अशी ग्वाही नाईक यांनी या वेळी दिली.

Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव पदवीधरांच्या हक्काचा आवाज बनतील : माजी मंत्री शिवाजीराव नाईक
Dr. Smita Jadhav : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : डॉ. स्मिताताई जाधव

माहेरच्या मंडळींचे आशीर्वाद पाठीशी : डॉ. स्मिताताई जाधव

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. स्मिताताई जाधव भावुक स्वरात म्हणाल्या, “मी पुणे पदवीधर मतदारसंघातून जनसेवेचा वसा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मुळापासून समजून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. गेल्या २५ वर्षांपासून टोमॅटो एफएम, दै. 'पुढारी' आणि 'कस्तुरी क्लब'च्या माध्यमातून सातत्याने समाजकार्यात सक्रिय आहे. या प्रवासात महिलांना स्वाभिमानाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मी केले. आज शिराळ्यात येऊन माहेरच्या मंडळींचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्याने कामाची ऊर्जा द्विगुणित झाली आहे.”

Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव पदवीधरांच्या हक्काचा आवाज बनतील : माजी मंत्री शिवाजीराव नाईक
Dr. Smita Jadhav | कोल्हापूरची सून विधानपरिषदेत पाठविण्याचा महायुतीचा निर्धार

या वेळी युवा नेते सत्यजित नाईक, जिल्हा परिषद सदस्या राजेश्वरी नाईक, देवयानी नाईक यांच्यासह यशवंत उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पदवीधर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news