बाप रे..! शंभरफुटीवर पुन्हा पडले भगदाड

सहा महिन्यांत सहा खड्डे : ड्रेनेज लाईन तपासणीसाठी चेन्नईहून येणार रोबोट
At a hundred feet, the avalanche fell again
सांगली : शंभरफुटी रस्त्यावर पडलेला खड्डा. Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील शंभरफुटी रस्त्यावर (राजर्षी शाहू महाराज मार्ग) दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा भगदाड (खड्डा) पडले. शहरात सहा महिन्यांत चार ठिकाणी सहा खड्डे पडले. महापालिकेच्या जुन्या ड्रेनेज लाईनवर हे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात अथवा जीवित हानी होण्याचीही भीती आहे. दरम्यान, जुनी ड्रेनेज लाईन तपासण्यासाठी चेन्नईहून रोबोट मागविला आहे. प्रात्यक्षिकानंतर जुनी ड्रेनेज लाईन तपासली जाईल. गरजेनुसार ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

At a hundred feet, the avalanche fell again
नाशिक : तरुणाचा बळी गेला! भगूरमध्ये 'त्या' खड्डा दुर्घटनेप्रकरणी कर्मचारी निलंबित

शहरात प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडण्याची मालिकाच सुरू आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान शंभरफुटी रस्त्यावर डी-मार्टजवळ पहिला खड्डा पडला. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी याच रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ मोठा खड्डा पडला. हा खड्डाही ड्रेनेज लाईनवरच पडला. त्यामुळे जीर्ण झालेली ड्रेनेज लाईन बदलण्याचा विषय ऐरणीवर आला. या खड्ड्याची चर्चा संपते न संपते तोच, संजयनगर चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात दोनदा खड्डे पडले. याठिकाणीही ड्रेनेज लाईनवरच खड्डा पडला.

त्यानंतर शहरात सिव्हिल हॉस्पिटल ते शंभरफुटी रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावर श्वास हॉस्पिटलजवळ खड्डा पडला. याठिकाणीही ड्रेनेज लाईनवरच खड्डा पडला आहे. गारपीर चौकातही रस्त्यावर खड्डा पडला. सहा महिन्यांत सहा खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी खड्ड्याखाली ड्रेनेज लाईन आहे. शुक्रवारी शंभरफुटी रस्त्यावर खड्डा पडला. दीड महिन्यापूर्वी ज्याठिकाणी खड्डा पडला होता, त्या खड्ड्याच्या मागेच हा खड्डा पडला आहे. याठिकाणी 15 फूट खाली महापालिकेची 700 मि.मी. जाडीची ड्रेनेज लाईन आहे. दरम्यान, या खड्ड्याभोवती बॅरिकेट्स लावले आहेत. दुुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी दिली.

अबब! रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी २२ हजार खर्च(Video)

घटनेची गंभीर दखल : आयुक्त

आयुक्त गुप्ता म्हणाले, शहरात ड्रेनेज लाईनवर रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या ड्रेनेज लाईनवर हे खड्डे पडले आहेत. त्याची गंभीर दखल घेत आहोत. जुनी ड्रेनेज लाईन तपासणीसाठी चेन्नईहून रोबोट मागविला आहे. तपासणीचे प्रात्यक्षिक होईल. त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन जुनी ड्रेनेज लाईन तपासली जाईल. गरजेनुसार ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल. ड्रेनेज लाईनसंदर्भात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाकडूनही तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news