Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या बहिणीच्या चार खात्यांवर अडीच कोटींचे व्यवहार

शिर्डी पोलिस घेणार जबाब; ‌‘त्या‌’ 24 जणांना समन्स पाठवले
Rupali Chakankar
रूपाली चाकणकरFile Photo
Published on
Updated on

नगर ः समता पतसंस्थेत चाकणकर नावे असलेल्या चार खात्यांतून 2 कोटी 40 लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्या चारही खातेधारकांना पोलिसांनी नोटीस पाठवत जबाबासाठी बोलविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यांच्या नावे समतामध्ये खाते आहेत, त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही, अशा खातेधारकांना पोलिसांनी पोस्टाने नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर शुक्रवारी राहाता कोर्टात सुनावणी होणार आहे.

बहुचर्चित भोंदू खरात याने शिर्डीतील काही एजंटांच्या मदतीने रावसाहेब गोंदकर याची 50 कोटी बाजारमूल्य असलेली चार एकर जमीन पाच कोटींमध्ये हडपली. याप्रकरणी पोलिसांत अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह किरण सोनवणे, अरविंद बावक व अशोक तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. अशोक खरात हा पूर्वीपासून अटकेत आहे; तर सोनवणे आणि बावके न्यायालयीन कोठडीत आहेत. कल्पना खरात आणि अशोक तांबे फरार आहेत. नगर पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करत कल्पना खरातचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नही हाणून पाडला आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी राहाता कोर्टात वकिलामार्फत अर्ज दाखल केला असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, चाकणकर नावाची चार खाती समता पतसंस्थेत असून त्या खात्यांना भोंदू खरात नॉमिनी असल्याचे समजते. या चार खात्यांतून 2 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या खात्याची पडताळणी करण्याकरिता पोलिसांनी चाकणकर यांना नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news