सांगलीत अल्पवयीन मुलीवर पॅरोलवरील गुंडाकडून बलात्कार

पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची निदर्शने; संशयिताला दीड तासात अटक
A minor girl was raped by a parole goon in Sangli
सांगलीत अल्पवयीन मुलीवर पॅरोलवरील गुंडाकडून बलात्कारfile photo
Published on
Updated on

येथे पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले. खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेल्या गुंडाने हा बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय प्रकाश माने (वय 34) असे संशयिताचे नाव आहे. बलात्काराची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.बदलापूर, कोलकाता, कोल्हापूर आदी ठिकाणी झालेल्या घटनांच्या निषेधार्थ जिल्ह्यात निषेध आंदोलने सुरू असताना बलात्काराची ही घटना उघड झाली. त्यामुळे जिल्ह्यातून संतापाची लाट पसरली. त्याचे पडसाद समाजमाध्यमातही उमटले. बलात्कार झाल्याचे समजल्यावर संजयनगर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमा झाला.

A minor girl was raped by a parole goon in Sangli
वाशिम : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार

जमावाने निदर्शने करीत दोषीला फाशी देण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव होता. घटनेची गांभीर्याने दखल घेत संजयनगर पोलिसांनी दीड तासात संशयित संजय माने याला भिवघाट (ता. खानापूर) येथून ताब्यात घेतले. त्याला अटक झाल्याचे समजताच तणाव निवळला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाललैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (पोक्सो)सह अन्य कलमांनुसार मानेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सराईत गुन्हेगार संजय व पीडिता एकाच परिसरात राहतात. तो काही महिन्यांपूर्वीच पॅरोलवर सुटला होता. गेल्या महिन्यात त्याने पीडित मुलीस, तू मला आवडतेस, असे म्हणून तिचा हात पकडत विनयभंग केला होता. पण त्याबाबत पीडितेने वाच्यता केली नव्हती.

A minor girl was raped by a parole goon in Sangli
Ajit Pawar : अत्याचार करणाऱ्यांचे गुप्तांग छाटले पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पीडित मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी मानेने तिला बोलाविले. ओळखीचा असल्याने ती त्याच्याजवळ गेली. त्याने तिचे तोंड दाबून तिला आपल्या घरात नेऊन लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली. शनिवारी सकाळी पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. सहायक निरीक्षक गणेश कोकाटे, कपिल साळुंखे, दीपक गायकवाड यांनी संशयित माने याचा माग काढून त्याला भिवघाट येथे ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे तपास करीत आहेत.

मानेला 14 वर्षे शिक्षा

संशयित माने हा सराईत गुन्हेगार आहे. 2011 मध्ये शहरातील प्रिया हॉटेलसमोर झालेल्या खुनात त्याचा सहभाग होता. एप्रिल 2013 मध्ये त्याला या खुनाबद्दल 14 वर्षे शिक्षा झाली होती. त्याच्यावर खुनी हल्ल्याचाही गुन्हा दाखल आहे.

A minor girl was raped by a parole goon in Sangli
कोल्हापूर : शिये अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी

जमावाकडून घोषणाबाजी

घटना समजताच संजयनगर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमा झाला. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, भाजपचे शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, माजी नगरसेवक मनोज सरगर, संजय कांबळे यांच्यासह अनेकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. संशयितावर कठोर कारवाई करावी, त्याला फाशी द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करीत जमावाकडून घोषणाबाजीही झाली. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news