

शिरोली एमआयडीसी;- पुढारी वृत्तसेवा
महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. त्यामध्ये कोल्हापुरातील शिये येथील १० वर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी मामाला कठोर शिक्षा व्हावी. यासाठी ताराराणी ब्रिगेड महिला मंचच्या वतीने शिरोली पोलिस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. निवेदन देताना या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध लावल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.
शिये येथील घटना अतिशय निंदनिय आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात या गुन्हयाचा छडा लावला या बददल आम्ही पोलिस कर्मचा-यांचे विशेष आभार मानतो तसेच ताराराणी ब्रिगेड महिला मंच तर्फे निषेध नोंदवून आरोपींवर कठोर करावाई करणेत यावी अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. तर शालेय मुलींसाठी आपल्या निर्भया टिम तर्फे शाळास्तरावर समुपदेशन करणेत यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी ताराराणी ब्रिगेड संचालिका अनिता माने, राजश्री पाटील, सुचिता कोरवी, आर्चना पाटील आदिसह उपस्थित होते.