बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजीच असताना, वाशिममध्ये 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या संपुर्ण घटनेने वाशिम जिल्हा हादरला आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील एका वसाहतीत राहणाऱ्या 13 वर्षीय चिमुकलीच अपहरण करुन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन रिसोड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेची दखल घेत जिल्हाभरात आंदोलन सुरु आहेत. तसेच जागोजागी निषेध नोंदवला जात आहे.