सांगली : कवठेएकंदमध्ये अचानक लागलेल्या आगात ऊसतोड मजुरांच्या झोपड्या खाक

सांगली : कवठेएकंदमध्ये अचानक लागलेल्या आगात ऊसतोड मजुरांच्या झोपड्या खाक

कवठेएकंद ः पुढारी वृत्तसेवा : येथील वसगडे रस्ता परिसरात अचानक लागलेल्या आगीत ऊसतोडणी मजुरांच्या तीन झोपड्या जळून खाक झाल्या. नामदेव विष्णू लांडगे, रूपेश ईश्‍वर लांडगे (दोघे रा. इरळी, ता. कवठेमंकाळ), अमोगसिद्ध पीराप्पा हडपर (रा. सावळसंघ, कर्नाटक), रघुनाथ नामदेव लेंगरे (रा. व्हसपेट, ता.जत) यांच्या झोपड्या जळाल्या.

यामध्ये या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मंगळवारी सकाळी ही आग लागली. येथे वसगडे रस्ता परिसरात मोहनराव शिंदे साखर कारखान्याची ऊसतोडणी मजुरांची कुटुंबे राहत होती. मंगळवारी सकाळी अचानक या झोपड्यांना आग लागली.

हेही वाचलंत का? 

logo
Pudhari News
pudhari.news