चांदोली राष्ट्रीय उद्यानात आजपासून पर्यटकांना प्रवेश बंदी | पुढारी

चांदोली राष्ट्रीय उद्यानात आजपासून पर्यटकांना प्रवेश बंदी

वारणावती : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाकडून प्राप्त सूचना व आदेशानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली येथील पर्यटन उद्या सोमवार (ता.10) पासून पूढील आदेश होईपर्यंत बंद राहील पर्यटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी केले आहे.

राज्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वीच कोरोणाच्या नियमांचे पालन म्हणून लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या पर्यटकांनाच चांदोली प्रवेश देण्यात येत होता. आता त्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उद्या सोमवार पासून संपूर्ण पर्यटनच बंद करण्यात आले आहे.

चांदोली धरणावरील प्रवेशाबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ते सुरू ठेवायचे की बंद करायचे याबाबत वरिष्ठांशी बोलून आज निर्णय घेण्यात येईल असे वारणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले.

Back to top button