सांगली : एकरी 140 टन ऊस उत्पादन

शेणे :येथे प्रयोगशील शेतकरी विनायक निकम व विशाल निकम यांनी अवघ्या एक एकरात तब्बल 140 टन लागण उसाचा उतारा मिळविण्यात यश पटकविले.
शेणे :येथे प्रयोगशील शेतकरी विनायक निकम व विशाल निकम यांनी अवघ्या एक एकरात तब्बल 140 टन लागण उसाचा उतारा मिळविण्यात यश पटकविले.
Published on
Updated on

कासेगाव : पुढारी वृत्तसेवा ; सध्या बदलत्या वातावरणामुळे एकरी उसाचे उत्पन्न घटत आहे. मात्र शेणे येथील प्रयोगशील शेतकरी व सरपंच विनायक निकम व विशाल निकम या बंधूंनी अवघ्या एकाएकरात तब्बल 140 टन उतारा घेतला आहे.

शेणे :येथे प्रयोगशील शेतकरी विनायक निकम व विशाल निकम यांनी अवघ्या एक एकरात तब्बल 140 टन लागण उसाचा उतारा मिळविण्यात यश पटकविले.
शेणे :येथे प्रयोगशील शेतकरी विनायक निकम व विशाल निकम यांनी अवघ्या एक एकरात तब्बल 140 टन लागण उसाचा उतारा मिळविण्यात यश पटकविले.

एका एकरात 45 हजार रुपये खर्च आला असून, पूर्णपणे केलेल्या व्यावसायिक व्यवस्थापनाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया निकम यांनी व्यक्त केली. निकम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पिके, भाजीपाला कलिंगड, ढबू मिरची, झेंडू फूले या पिकांच्या विक्रमी उत्पादनासाठी नाव कमावले आहे.

शेणे येथे त्यांनी 86032 या उ साची लागण केली होती. या पिकासाठी पाण्याची सोय ठिबकने केली होती. तसेच खते, विविध आणि वेळेवर केलेल्या फवारण्या यामुळे पीक जोमदार आले. यासाठी त्यांनी रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर केला. शेणखत, जैविक खते पुरेशा प्रमाणात वापरली. एकरी 140 टनाचा उतारा मिळाला असल्याचे निकम यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकर्‍यांनी उसासाठी पाणी, खते याचा मनमानी वापर न करता योग्य प्रमाणातच पाणी व खतांचे नियोजन करावे. तसेच पाचट न पेटविता शेतातच कुजविण्याचा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news