सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पाटील यांच्या पाठिशी ठाम, अजित पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पाटील यांच्या पाठिशी ठाम, अजित पवार यांचे प्रतिपादन

तासगाव, पुढारी वृत्तसेवा

माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील याची काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहितच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीत पक्षाची ताकद रोहित पाटील याच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलच्याच पाठिशी असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली.

मनसे सोडलेल्या रुपाली ठोंबरे – पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीत स्व. आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याने उभे केलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनेल विरोधात सर्व पक्ष एकवटले आहेत. राष्ट्रवादीचा एक गटही रोहितच्या विरोधात आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे विचारणा केली.

याबाबत बोलताना पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीमध्ये जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन निर्णय घेतले जातात. राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील सांगलींचे पालकमंत्री आहेत. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीसंदर्भात जयंत पाटील यांचेकडून माहिती घेणार आहे.

रोहित पाटील याच्याशी बोलणार

अजित पवार म्हणाले, मी स्वत: कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीच्या राजकीय परिस्थितीबाबत रोहित पाटील सोबत बोलणार आहे. निवडणूकीत रोहितच्या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी पक्षाची सर्व ताकद त्याच्या पाठिशी असेल.

हेही वाचा

Back to top button