Bangladesh War : “इंदिरा गांधींनी देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या; पण…” | पुढारी

Bangladesh War : "इंदिरा गांधींनी देशासाठी ३२ गोळ्या झेलल्या; पण..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९७१ च्या युद्धात (Bangladesh War) भारताच्या विजयाची आठवण काढताना काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, “मोदी सरकार इंदिरा गांधी यांना त्यांच्या कामाचे श्रेय देत नाही. कारण हे सरकार खरेपणाला घाबरत आहे. त्यामुळे विजय दिवसानिमित्त आयोजिय कार्यक्रमात त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.” यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदी सरकारवर आरोप म्हंटलं आहे की, “काही लोक इंदिरा गांधी यांना विसरण्यात यावं, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.”

राहुल गांधी डेहराडूनमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, “बांगलादेश युद्धासंदर्भात (Bangladesh War) आज दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाचा साधा उल्लेखदेखील केला नाही. ज्या महिलेने देशासाठी आपल्या शरीरावर ३२ गोळ्या झेलल्या, त्यांचं नाव आमंत्रणात नव्हते. कारण, मोदी सरकार खरेपणाला घाबरत आहे.” माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या ही त्यांच्या अंगरक्षकाने केलेली होती.

यापूर्वी काॅंग्रेस नेता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “काही लोक जाणीवपूर्वक इंदिरा गांधी यांनी विसरविण्यासाठ प्रयत्न करत आहेत. बांगला देशातील लोक आजच्या दिवसाची आठवण ठेवतात. जवाहर लाल नेहरूंपासून इंदिरा गांधीपर्यंत लोकशाहीसाठी प्रयत्न करत आले आहेत. मात्र, काही लोक १९७१ च्या युद्धातील योगदान विसरण्याासाठी प्रयत्न करत आहेत.”

काॅंग्रेसने विजय दिवसानिमित्ताने गुरुवारी आयोजित कार्यक्रमात १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या विरोधात विजय मिळविण्यासाठी भारतीय लष्कराला सलाम केला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुशल नेतृत्वाची आठवण काढली. काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “१९७१ च्या युद्धातील शहीद जवानांची आठवण काढतो. इंदिरा गांधीच्या कुशल नेतृत्वात लोकशाही विचारांना वाचविण्यासाठी युद्धात विजय मिळविला. जय हिंद.”

पहा व्हिडीओ : भारतीय लष्कराने घडवलेल्या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण

Back to top button