Shiv Sena MLA Anil Babar | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shiv Sena MLA Anil Babar | शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघांचे आमदार अनिल बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांना कफचा त्रास होत असल्याने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Shiv Sena MLA Anil Babar)

बाबर यांना कफचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. १९९० ते १९९५, १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ असे चार वेळा ते आमदार राहिलेत. अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे. त्यांनी खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते. त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती. बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव दुपारपासून विटा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज बुधवारी दुपारी चार वाजता सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news