खरसुंडी जनावरांच्या यात्रेत सात कोटींची उलाढाल; तीन राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग

खरसुंडी जनावरांच्या यात्रेत सात कोटींची उलाढाल; तीन राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग

आटपाडी(सांगली), पुढारी वृत्तसेवा : खरसुंडी ता.आटपाडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेत तब्बल सात कोटींची उलाढाल झाली.पाच दिवसांच्या यात्रेची आज सांगता झाली. कोरोना नंतर गेल्या वर्षी यात्रा झाली.परंतु यंदा यात्रेला मोठा प्रतिसाद लाभला.तीन राज्यातील शेतकरी आणि व्यापारी या यात्रेत सहभागी झाले होते.

खरसुंडी येथील पौष यात्रा माणदेशी

खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी तीन राज्यात प्रसिध्द आहे. हौशी शेतकरी जनावरांना सजवून हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात यात्रेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचा उत्साह आणि जनावरांच्या मोठ्या संख्येने खरसुंडी येथील माळरानाचा परिसर गजबजला होता. महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी आणि व्यापारी देखील या यात्रेत सहभागी झाले होते.

खरसुंडी ते आटपाडी रस्त्यावर ही यात्रा नेहमी भरते. परंतु त्या परिसरात बांधकामे वाढल्याने खरसुंडी झरे रस्त्यावर ही यात्रा भरवण्यात आली.यात्रेत सांगली,सातारा आणि कोल्हापूर भागातील शेतकरी जनावरे विक्रीसाठी आले होते. पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील तसेच पर राज्यातील शेतकरी जनावरे खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते

यात्रेत खिलार गाई,लहान खोंड, प्रजोत्पादनासाठी आणि शर्यतीसाठी वापरले जाणारे वळू आणि शेती कामासाठी वापरले जाणारे बैल खरेदीसाठी मोठया प्रमाणात आले होते. यात्रेत तब्बल २० हजार जनावरे दाखल झाली होती.

माणदेशी जातिवंत खिलार जनावरे वैशिष्ट्यपूर्ण असतात. अत्यंत आकर्षक ही जनावरे चपळ आणि काटक असतात. शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बैलांना चांगली किंमत मिळाली. खोंडांना देखील चांगली मागणी होती.खोंडांना ३५ ते ७० आणि बैलांना ७५ ते १.२५ लाख रुपयांचा दर मिळाला.

यात्रेत खरेदीनंतर जातिवंत खोंड आणि वळूची पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढल्या.ग्रामपंचायत आणि बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची आणि दिवाबत्ती व्यवस्था केली होती.

कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव म्हणाले दोन वर्षाच्या मोठ्या काळानंतर गत वर्षी यात्रा भरली.पण या वर्षी मोठी यात्रा भरली आहे.२० हजार जनावरे आली आणि सात कोटींची उलाढाल झाली. बैलगाडी शर्यतीस परवानगी मिळाल्याने खिलार बैल आणि खोंडांना मोठी मागणी आहे. हौशी शेतकरी आपली शर्यतीची हौस पुरवण्यासाठी जातिवंत जनावरांच्या शोधात असतात.खरसुंडी यात्रेत खोंड आणि बैलांना चांगली किंमत मिळाली.
– शेतकरी 

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news