परभणी: इसादजवळ बसच्या धडकेत दोन दुचाकींवरील ३ जण जखमी | पुढारी

परभणी: इसादजवळ बसच्या धडकेत दोन दुचाकींवरील ३ जण जखमी

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा: एसटी बसने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ३ तरुण जखमी झाले. दोन जखमींना अंबाजोगाईला हलविण्यात आले आहे. हा अपघात आज (दि.१८) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास गंगाखेड – किनगाव रस्त्यावरील इसाद नजीक सुप्पा फाटा परिसरात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी गंगाखेडहून इसाद- सुप्पा मार्गे किनगावला जाणाऱ्या एसटी बसने इसाद जवळील सुप्पा फाटा परिसरात एका ऑटोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. यात दोन्ही दुचाकीवरील तिघांना मोठी दुखापत झाली. वैजनाथ पांडुरंग पेंडलवाड (वय २०), बाबू दत्ता नरवाडे (वय ३५) व सिद्धेश्वर बाळू नरवाडे (वय १९, सर्व रा. इसाद) हे जखमी झाले आहेत. गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर वैजनाथ पेंडलवाड व बाबू नरवाडे या दोघांना अंबेजोगाई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हेही वाचा 

Back to top button