सांगली : एसटीचे 70 कर्मचारी निलंबित | पुढारी

सांगली : एसटीचे 70 कर्मचारी निलंबित

सांगली : पुढारी वृत्तसेवा

एसटी महामंडळाचे जिल्ह्यातील एसटीचे 70 कर्मचारी निलंबित   करण्यात आले. एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. एसटीच्या संपात सहभागी तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील 268 कर्मचार्‍यांची ते कामावर हजर न झाल्यास सेवासमाप्ती केली जाईल, अशा नोटिसा बजावल्या होत्या.त्यानंतर गुरुवारी चौघेजण कामावर हजर झाले. आज शिवशाहीच्या पाच गाड्या सुरू होत्या. मिरज ते कागवाड व जत ते विजापूर मार्गावर एसटी सुरू करण्यात आली.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. सर्व संघटना संपात उतरल्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले आहे. जिल्ह्यातील सर्व  एसटीचे 70 कर्मचारी निलंबित

वाहतूक ठप्प झाली आहे. खासगी वाहतुकीला बसस्थानकातून परवानगी दिल्यामुळे त्यांच्यामार्फत सध्या प्रवासी वाहतूक सुरू खासगी शिवशाहीच्या पाच गाड्या सध्या सुरू आहेत. आज मिरज ते कागवाड मार्गावर बस सोडण्यात आल्या होत्या. तसेच जतमधून विजापूर मार्गावरदेखील बस सोडण्यात आली. या फेर्‍या वगळता एस.टी.ची इतर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.संपामध्ये एस.टी.चे चालक- वाहक यांच्याबरोबरच इतर विभागातील कर्मचारीही आता सहभागी होत आहेत. बुधवारी विभागीय कार्यालयातील 25 कर्मचारी सहभागी झाले होते. आज विभागीय वर्कशॉपमधील 9 कर्मचारी सहभागी झाले. लेखणी बंद आंदोलन सुरु केल्याने 70 जणांवर कारवाई करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ कर्मचारी संघटनांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील 268 कर्मचार्‍यांना 24 तासात कामावर हजर न झाल्यास सेवासमाप्त केली जाईल, अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.प्रत्यक्ष व सोशल मीडियावरूनही या नोटीसा दिल्या आहेत. गुरुवारी 24 तासाची मुदत संपण्यापूर्वी केवळ चारच कर्मचारी हजर झाले. इतर कर्मचारी संपात सहभागी आहेत. संपामुळे कर्नाटकातून जिल्ह्यातील विविध मार्गावर धावणार्‍या बस तोडफोडीच्या भितीने बंद आहेत. परंतु प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्नाटकातील गाड्यांच्या जिल्ह्यातील काही मार्गावर फेर्‍या सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

Back to top button