मनोज जरांगेंची सांगली जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा विट्यात | पुढारी

मनोज जरांगेंची सांगली जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा विट्यात

विटा; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची सांगली जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा विट्यात शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेला मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता विटा येथील श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात जरांगे-पाटील यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. याबाबत माहिती देताना शंकर मोहिते म्हणाले, मनोज जरांगे हे १५ ते २३ नोव्हेंबर असा राज्य दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील मराठा समाजबांधवांशी ते संवाद साधणार आहेत. या सभेसाठी खानापूर तालुक्यातील सर्व मराठा समाजबांधवांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहनही मोहिते यांनी केले आहे.

यावेळी जगन्नाथ पाटील, दहावीर शितोळे, विकास जाधव, विठ्ठलराव साळुंखे, विनोद पाटील, कुलदीप पाटील, राजू जाधव, अजय पाटील, पांडुरंग पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button